Bail Pola : शेतातील मेहणतीच्या कामासाठी वरचेवर कृषी यांत्रिकीकरणाचा (agriculture mechanization) वापर वाढला आहे. शेतातील बैलांची गरज कमी झाली आहे. त्यामुळे बैलांची संख्या (Bull contity) कमी होत चालली आहे. अलीकडे शेतकरी शेतात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करु लागला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे आजचा बैलपोळा (Bail Pola) साजरा करण्यासाठी बैलच नसल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाची माहिती : खरे हे आहे बैल पोळ्याचे महत्व !
यंद राज्यातील बहुतांश भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस (rain) झालेले नाही. काही भागात तर यंदा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाम (khrip season) धोक्यात आला आहे. शिवाय जनावरांच्या चार आणि पाण्याचा प्रश्न (water Issue) काही भागात भेडसावत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडे पोळा सणावर लम्पी स्कीन (Lumpy skin) आजाराचे सावट देखील दिसून येत आहे. यंदा लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये बैलांच्या मिरवणुकांवर प्रतिबंध (Ban on processions) घालण्यात आला आहे. बैलपोळा (Bail Pola) साधेपणाने सण साजरा करा असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ पशुवैद्यक नितीन मार्कंडेय (Nitin markenday) यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात 1 कोटी 39 लाख एवढी पशुधनाची संख्या आहे. त्यातील 1 कोटी 10 लाख जनावरे ही वंशावळीची माहिती नसणारी आहेत. तर 15 लाख जनावरे ही शुद्ध जातीची आहेत. उर्वरित 27 लाख जनावरे संकरीत आहेत. राज्यात म्हशींची (Buffalo),संख्या ही 55 लाखांच्या आसपास आहे तर राज्यात सात प्रकारच्या अधिकृत नोंदणी असलेल्या गायींच्या (Cows) जाती आहेत. मात्र दिवसेंदिवस पशुधनाची संख्या घटत आहे. विशेषत: कृषी यांत्रिकीकरणामुळे (agriculture mechanization) बैलांची संख्या कमी होऊ लागली लागली आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळ्याच्या सणाला विशेष महत्व आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या सणावर लम्पी स्कीन आजाराबरोबरच दुष्कालाचेही सावट आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांकडे आजचा बैलपोळा साजरा करण्यासाठी बैलच नसल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी : खते महागणार ?, शेतकऱ्यांचा खर्च वाढणार !
शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रांवर सबसीडी दिली जाते. त्यामुळे शेतीमध्ये हल्ली मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा (mechanization) वापर सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीतील बैलांची गरज कमी झाली आहे. परिणामी जातीवंत बैलांची पैदास (Bull Breeding) कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील बैलांची संख्या कमी होऊ लागली आहे. शेतीतील बैलांची गरज कमी झाल्याने शेतकऱ्यांचे बैलांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे बैलांमधील आजारांचे प्रमाण वाढले आहे. लम्पी स्कीन आजारामुळे गायींपेक्षा बैलांचा जास्त प्रमाणात मृत्यू झाला आहे.
आता बैलांचे प्रमाण वाढवण्यासाठी शेतात बैलांचा वापर वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. शुद्ध बैलांची पैदास (Bull Breeding) करण्यासाठी चांगले वळू निर्माण करावे लागणार आहेत. बैलांसाठी मोफत उपचाराची सुविधा करण्याची गरज निर्माण झाली आहे. बैलांचा वापर वाढला तर जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढून जमीन सुपीक (land fertile) होण्यास मदत होणार आहे. बैलांच्या संवर्धनासाठी (Bull Conservation) सरकारने काही योजना आखणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ पशुवैद्यक मार्कंडेय यांनी व्यक्त केले आहे.
चिंताजनक : पाऊस गायब…पिकांवर रोगराई… शेतकऱ्यांची चिंता वाढली
https://www.facebook.com/shetimitramagazine03