गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारण हे ओला दुष्काळाच्या मुद्द्यावरुन चांगलेच तापले आहे. अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र तसे झाले नाही. अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यासंदर्भातील मागणी केली आहे. असे असले तरी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार टाळाटाळ का करत आहे.
मोठी घोषणा : लवकरच शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल : उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
राज्यात यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने आणि परतीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील दोन-तीन वर्षांच्या नुकसानीनंतर यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना फारच आशादायी वाटत होता. त्यामुळे राज्यात 147 लाख हेक्टर अशा विक्रमी क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. पण याच पावसान पुढे जाऊन शेतकऱ्यांना धोका दिला. परतीच्या पावसाने तर कहरच केला. उभी पिके पाण्याखाली गेली, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. अशा सगळ्या परिस्थितीत शासानाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षांबरोबरच शेतकरी संघटना करत आहेत. दरम्यान, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणतात की ‘‘ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही.’’ अशावेळी ओला दुष्काळ म्हणजे काय प्रकार आहे, ते जाणून घेतलेच पाहिजे.

ओला दुष्कालाबाबत डॉ. अजित नवले म्हणतात…
याबाबत किसानसभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या मते उत्पादन नष्ट होणे म्हणजेच ओला दुष्काळ ! अवेळी जो पाऊस येतो, तो जरी सरासरीपेक्षा कमी असला तरी त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होते. किती पाऊस पडला हे महत्वाचे नाही तर यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान किती झाले हे महत्वाचे आहे. अवेळी पाऊस येण हिच शेतकऱ्यांचे दृष्टीने आपत्ती आहे. शेती उत्पादन नष्ट होणे म्हणजेच ओला दुष्काळ नव्हे. संपूर्ण खरीप हंगामाकडे नजर टाकल्यावर आपल्याला समजेल शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामाचा सरकारने आढावा घ्यावा अशी मागणी डॉ. नवले यांनी केले आहे.
ओला दुष्काळ म्हणजे नेमके काय ?
सामान्यपणे दुष्काळ म्हटल्यावर कोरडी जमीन, पाण्याची कमतरता असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र ओला दुष्काळ ही कोरड्या दुष्काळाच्या अगदी विरुद्ध परिस्थिती असते. एकाद्या ठराविक क्षेत्रामध्ये काही काळ सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतमाल आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अतिवृष्टीमुळे पिके वाहून जातात, शेतमाल खराब होतो, जागोजागी पाणी साचते, शेतातील माती वाहून जाते यासारख्या परिस्थितीला सामान्यपणे ओला दुष्काळ असे म्हणतात.
ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांचा 26 नोव्हेंबरला चिखली येथे शेतकरी मेळावा
अगदी आकडेवारीनुसार सांगायचे झाल्यास एका दिवशी 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस असेल, तर त्याला अतिवृष्टी संबोधतात. तसेच या अतिवृष्टीमुळे 33 टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाल्यास तो भाग ओला दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखता जातो. सध्याच्या सरकारी नियमांनुसार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागामध्ये कोरडवाहू शेतीसाठी प्रती हेक्टर 13 हजार रुपयांच्या आसपास मदत केली जाते तर बागायती शेतीसाठी 18 हजार प्रती हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.

विरोधकांकडून जरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली, सरकार टाळाटाळ करत असल्याचे आरोप होत असले तरी अशापद्धतीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची तरतूदच अस्तित्वात नाही. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातल्या इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पण, ओला दुष्काळ जाहीर करण्याची तरतूदच नसून दुष्काळ संहिता ही फक्त कोरड्या दुष्काळाबद्दल आहे. एका दिवशी 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस असेल, तर त्याला अतिवृष्टी संबोधतात आणि पूर-अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाईचे निकष केंद्र सरकारने न बदलल्याने तोकडी मदत मिळते, असा महाराष्ट्र राज्य किसान सभेचा आक्षेप आहे.
मोठी बातमी : यंदा द्राक्ष उत्पादकांना फटका : दिड महिना उशीराने द्राक्ष बाजारात येणार !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1