पुरातन काळापासून आर्थिक सुबतेचे निकष हे त्या व्यक्तिगत माणसाच्या, सरदाराच्या, राजाच्या जवळ असलेल्या गोधनावर निश्चित होत असते. याच गोधनामुळे आर्थिक प्रगती शेती विकास आणि सामाजिक स्थैर्यता येत असे. आपला भारत जसा वैविध्यतेने नटलेला आहे, तशाच प्रकारे भारतीय गोवंशामध्ये देखील वैविध्यतेने नटलेला आहे. तशाच प्रकारे भारतीय गोवंशामध्ये देखील वैविध्य आहे. उदा. डांगी, देवणी, साहीवाल, कांकरेज, वेच्चूर, खिल्लार, अमृतमहल, गिर, कंधारी इत्यादी या विविध भारतीय गोधनामध्ये काही प्रजाती या फक्त दुधासाठी प्रसिध्द आहेत, तर काही गोवंश शेतीकाम, ओढकाम आणि शर्यतीचे बैल यांच्या उत्पत्तीसाठी प्रसिध्द आहेत तर काही गोवंश हे बहुउद्देशीय आहेत. दुग्धोत्पादनाबाबात गीर गोवंश हा विशेष नामांकन प्राप्त असा गोवंश आहे. वर्तमानकाळाची गरज लक्षात घेता उत्तम स्निग्ध्दांशाचे कसदार दूध, दूध सलग व भरपूर आणि जास्त काळ देणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये सुध्दा तग धरून राहणे, दोन वेतांमध्ये कमी कालावधीचे अंतर, भाकडकाळ कमी असेणे या सर्वगुणांचा मिलाप एकाच गोवंशामध्ये आढळतो तो गोवंश म्हणजे गीर गोवंश होय.
भारतीय गोवंशामध्ये सर्वोत्तम दुग्धोत्पादनाबाबात गीर गोवंश हा विशेष नामांकन प्राप्त असा गोवंश असून या गाईचे दूध आणि गोमूत्र दोन्हीची उपयुक्तता अलैकिक अशी आहे. वर्तमानकाळाची गरज लक्षात घेता उत्तम स्निग्ध्दांशाचे कसदार दूध, दूध सलग व भरपूर आणि जास्त काळ देण्याची क्षमता असल्याने हल्ली गीर गायचे महत्त्व वरचेवर वाढताना दिसते आहे.
शारिरीकक ठेवण : या गायी प्रामुख्याने लाल भडक रंगाच्या त्यावर पांढरे ठिपके काही पांढरे ठिपके काही प्रमाणात आढळतात, क्वचित लालसर काळा, संपूर्णपणे काळसर त्यावर ठिपके सुध्दा आढळतात. या गायी उंच व मोठ्या शारिरीक बांध्याच्या असताता, मस्तक मोठे व भरदार असते, शिंगे गोलाकार व मागून पुणे येणारी असतात व शिंगाचा रंग प्रामुख्याने काळसरच असतो. वशिंड मोठे, भरदार आणि घट्ट असते. डोळे लांबटगोल काजळ घातल्याप्रमाणे काळे तसेच तजेलदार आणि बोलके असतात. कान लांबलचक खाली पडलेले आणि नाकपुडी पर्यत येणारे असतात. नाकपुडी संपुर्णपणे काळी व चेहर्याच्या मानाने लहान असते. मानेखालील पोळी (लोळी) मोठी असते. बेंबी मोठी व लोंबणारी असते. कासेची ठेवण शरीराबाहेर येणारी गोल व मोठी असते. चारही सड (आचळ) लांबडे एकाच उंचीचे व समान अंतरावर असतात. निरण (सोवाळी) काळसर व सैलसर ठेवणीचे असते. खूर बहुतांशी काळ्या रंगाचे भक्कम आणि कडक असतात. शेपूट लांबलचक व गोंडा काळा आणि झुपकेदार असतो. या गोवंशाची उभे राहण्याची ऐट बहारदार व पाहताच क्षणी प्रेमात पडावे अशीच असते.
गिर या गोवंशाचे बैल याच प्रमाणे वर्णनाचे असतात फक्त बैलांमध्ये वशिंडाचा रंग शरीराच्या इतर रंगापेक्षा थोडा गडद छटेचा असतो. या जातीचे बैल वयाच्या तिसर्या वर्षापासून शेतीच्या कामाला शिकवण्यास व हलक्या कामास धरता येतात. वयाची सहा वर्षे पूर्ण झाली की बैलाचे खत्वीकरण करावे. या जातीचे बैल अत्यंत ताकदवान असून ओढकामात अत्यंत वाखाखण्याजोगे काम करतात. एकाच ठिकाणी एकाच मालकाकडे उत्तम जपणूकीचे बैल सहज 20 ते 22 वर्षे सलग चांगल्या पध्दतीने काम करतात. या जातीच्या बैलांचा सर्वात महत्त्वाचा विशेष गुण म्हणजे हे बैल शांत सुस्वभावी व मारकेपणा अजिबात नसतो. या गोवंशाच्या उत्तम बैलजोडीची किंमत सर्वसाधारणपणे 55 ते 60 हजारापर्यत आहेत.
दुग्धोत्पादन : गिर या गोवंशाच्या प्रथम माजाचे वय साधारणत: 30 ते 36 महिन्यांच्या दरम्यान असते. काही ठिकाणी उत्तम सांभाळलेल्या कालवडी 24 महिन्यांच्या देखील गाभण राहिलेल्याची नोंदी आहेत. या गोवंशाच्या गायींच्या दूधामध्ये पहिल्या तीन वेतांमध्ये विलक्षण वाढ दिसते. सर्वसाधारण सांभाळणी मध्ये दिवसाकाठी 6 ते 7 लिटर दूध सहज देतात. व्यावसायिक सांभाळणार्याकडे उत्तम खुराकावर दिवसाकाठी 10 ते 12 लिटर दूध सहज देतात. देशामध्ये राज्यस्तरीत दुग्धोत्पादन स्पर्धेमध्ये 24 तासात 17 लिटर दूध दिल्याची नोंद अधिकृत आहे. 10 ते 12 लिटर दूध देणार्या गायींची किंमत सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजारांपर्यत असते.
उत्पत्तीस्थान : आपल्या देशामध्ये गुजरात राज्याच्या पश्चिम व दक्षिण भागांमध्ये हा गोवंश मोठ्या संख्येने चांगल्या पध्दतीने सांभाळला जातो, तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील गुजराम सीमेजवळच्या भागात देखील हा गोवंश अत्यंत चांगल्या पध्दतीने सांभाळला जात असून कायम विक्रीसाठी उपलब्ध असतो. या गोवंशाची उत्तम दूध देण्याची क्षमता, जास्त स्निग्ध्दांशाचे दूध, उत्तम शारीरिक गुण या गुणांचा महत्वपूर्ण अभ्यास करून अमेरिकन शास्त्रज्ञांनी ब्राहाणी जातीची गिर गोवंशापासून विकसीत केली आहे.
भारतीय गोवंशाचे महत्व : आपल्या स्थानिक वंशाच्या गायी खराब हवामान, दुष्काळ अशा आपत्तीमध्ये सुध्दा दुग्धोत्पादनामध्ये विशेष घट दिसून येत नाही. दुग्धोत्पादन एक वेळ लिटर परीमाणात कमी असेल पण दुधाला दर चांगला मिळतो. उदा जर्सी गायीच्या 2.5 टक्के फॅटच्या 15 लिटर दूधाची किंमत 12 रू प्रति लिटर प्रमाणे एकूण विक्री किंमत रू 180 होते तर गिर गायीच्या 4.5 टक्के फॅटच्या दूधाच्या 10 लिटर दूधाची 20 रू प्रती लिटर प्रमाणे रू 200 विक्री किंमत होते. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आर्युवेदामध्ये आपल्या स्थानिक गोवंशाच्या गायीच्या दूधाला, ताकाला, लोण्याला आणि तूपाला अनन्य साधारण महत्त्व दिले आहे. स्थानिक गोवंशाच्या गायीच्या दुग्ध सेवनाने हाडातील कॅल्शिअम घट, मधुमेह, काही प्रमाणात कर्करोग, हृदयरोग इ. आजारांवर इलाज सांगितला आहे. स्थानिक गायीचे गोमुत्र 50 मि.ली. नित्य प्राशन केल्यास त्या माणसाचा वैद्यकीय खर्च अत्यंत अल्प झाल्याचे सिध्द झाले आहे.
स्थानिक गोवंशाचे बैल हेच फक्त आपल्या भारतीय शेतीत काम करू शकतात. परकीय वंशाचे बैल उन्हामध्ये काम करू शकत नाहीत. आपल्या कोणत्याही गोवंशाच्या वरील होणारा वैद्यकीय खर्च हा अत्यंत अल्प आहे कारण आपल्या स्थानिक गोवंशामध्ये रोग प्रतिकारक क्षमता विशेष वाखण्याजोगी आहे. स्थानिक गोवंशाच्या गायींची रवंथ प्रक्रिया मोठ्या कालावधींची असल्याने या गायींचे शेण पटकण कुजते व खत चांगल्या प्रतीचे तयार होते, तसेच गोमुत्र देखील शेतीमध्ये फवारणीसाठी उत्तम असल्याचे सिध्द झाले आहे. आपल्या गायींचा उच्छ्वास देखील फुप्फुसाच्या रोगाने बाधीत माणसाने श्वसन केल्यास त्याला फायदा होतो. यासाठी माझी प्रत्येक शेतकर्याला अत्यंत कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने एकतरी गिर गाय बाळगून स्वत:चा संसार, शेती समृध्द करा आणि चांगल्या कालवडी, बैलांची निर्मीती करून देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊया.
मिलिंद कृष्णाजी देवल प्लॉट क्र.5 इमारत क्र.सी-11, सरीतानगरी क्र-2, पुणे, सिंहगड रस्ता, पुणे. मोबा. 9960200767