मागील दोन महिन्यापूर्वी चांगला दर मिळवून देणार्या कांद्याच्या भावाची घसरण सुरू असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. खराब वातावरणामुळे खराब होणारा चाळीत साठवलेला कांदा व अतिरिक्त पावसामुळे जमिनीतच खराब होणारा खरीप हंगामातील लाल कांदा यामुळे वाढलेले कांद्याचे दर ; एकदम का कमी होऊ लागले आहेत ?
जास्त मागणी आणि पुरवठा कमी अशी अवस्था झाली की, दर वाढतात हे खरे असले तरी कांद्याच्या बाबत दर का पडत आहेत. याची कारणे अनेक आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, सध्याच्या काळात मध्य प्रदेशातून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला दर कमी मिळत आहे. तसेच राजस्थान मधील कांदा देखील यायला सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला दर कमी मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यासोबतच कांदा रोपवाटिकेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कांदा दर वाढण्याची प्रतीक्षा आहे. कांद्याची वाढलेली आवक आणि मध्य प्रदेश राज्यातून होणाऱ्या वाहतुकीच्या आर्थिक बचतीमुळे परराज्यातील कांदा व्यापारी महाराष्ट्रातील कांद्याला आता दुय्यमस्थान देत असल्याने ही दरावर परिणाम होत आहे.

गेल्या वर्षी दक्षिण भारतामध्ये देखील या वर्षी जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तेथील कांदा पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे येथील कांद्याची आवक कमी होती त्यामुळे दरात वाढ होण्याची शक्यता होती. परंतु या पार्श्वभूमीवरच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा बाजारात दाखल झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याला हवे तेवढे मागणी वाढली नाही.
हेही वाचा :
कांद्यावरील रोगांचे करा असे नियंत्रण
अशी करा कांदा रोपांची जोपासना !
उत्तमप्रतिच्या कांदा बियाण्यासाठी हे वापरा कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान
कांद्याच्या जाती आणि किड रोग व्यवस्थापन
हमखास पैसे मिळवून देणारे कांदा उत्पादन तंत्र
कांद्यावरील विषाणूजन्य रोगांचे करा असे नियंत्रण
जर आपण भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांना मध्यप्रदेश हे जवळचे राज्य असल्याने वाहतुकीसाठीकमी अंतर पडते.त्यामुळे व्यापाऱ्यांचा वाहतूक खर्चदेखील कमी झाल्यामुळे आर्थिक बचत होते.शिवाय मध्य प्रदेशातील व्यापारी महाराष्ट्रातील कांदा दरापेक्षा कमी दराने कांदा विक्री करत असल्याने दुसर्या राज्यातील व्यापारी मध्यप्रदेशातील कांद्याला पसंती देत आहेत.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा