अमेरिकेत सोयाबीनची उत्पादकता एकरी 30 क्विंटल आहे तर भारतात त्याची उत्पादकता अवघी चार क्विंटलची आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांचा उपयोग तरी काय ? कोणतीच भरीव उपलब्धी नसलेल्या कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग का द्यावा ? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला.
मान्सून अपडेट : राज्यात पुन्हा 4 ते 5 दिवस पाऊस मुक्कमी
माजी कृषिमंत्री शरद पवार आणि गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ कृषी अभ्यासक सुधीर भोंगळे यांना डॉ. सी. डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या वेळी डॉ. सी. डी. मायी, खासदार विकास महात्मे, माजी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, गिरीश गांधी, कुलगूरू डॉ. विलास भाले उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, देशात गहू, साखर, तांदळाचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात संपन्नता हवी असल्यास शेतकऱ्यांनी धान सोडून इतर पिकांकडे वळले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. बांगलादेशची मागणी असल्याने कापसाला भाव मिळाला. अशाप्रकारे बाजारपेठ असलेल्या पिकांचाच पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा.
महत्त्वाच्या टिप्स : शंखी गोगलगायी नियंत्रणाच्या 13 टिप्स !
देशात पाण्याची टंचाई नाही. परंतु त्याचा विनियोग योग्यरीतीने होत नाही. त्यामुळेच काही राज्यांमध्ये पाणीवाटपावरून वाद होत होते. 13 राज्यांमधील हे वाद केंद्रिय जलमंत्री असताना सोडविले. त्याच वेळी देशात 46 नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्यावर काम झाल्यास यापुढे देशात सिंचन सुविधात मोठी वाढ होत आत्महत्या नियंत्रणात येतील.
विदर्भात शास्त्रोक्त पद्धतीने उसाचे व्यवस्थापन व्हावे, या साठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) शाखा या भागात असावी, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यांनी या मागणीला बळ दिले आणि लवकरच या भागात इन्स्टिट्यूटच्या कामकाजाला सुरुवात होईल, असे गडकरी म्हणाले.
ब्रेकिंग न्यूज : गोदावरी, प्राणहिता नद्या तुडुंब : सतर्कतेचा इशारा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1