शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्यशासन करणार असून, त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.
गुडन्यूज : राज्यात पावसाला पोषक हवामान : आगामी 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार
आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून, बोगस बियाणे आणि खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.
राज्यात विविध भागात मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात मात्र पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हवामान विभागाने येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, कालच यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही लवकरच मदत मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोठा निर्णय : लॉटरी पद्धत बंद ; मागेल त्याला ड्रीप आणि शेततळे : कृषीमंत्री धनंजय मुंडे
https://www.facebook.com/shetimitramagazine03