शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळणार ?

0
3756

गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेला शेतीच्या वीजचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली असून, यामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात येत्या 15 दिवसात तज्ज्ञ समितीकडून अहवाल घेवून तो वीज नियामक आयोगाच्या मान्यतेचे याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले. याप्रसंगी ऊर्जामंत्री नितीन राऊत, राजू शेट्टी, बंटी पाटील, विजय सिंघल, राजू आवळे, अरुण लाड, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, जालंदर पाटील, सावकार मादनाईक, प्रकाश पोपळे संदिप जगताप आणि वीज मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारचे सध्याचे विजेचे बिल शेतीपंपास दिवसा वीज दिल्यावर महावितरण वरील आर्थिक भार याबाबतची माहिती देण्यात आली. ऊर्जामंत्री आणि अधिकाऱ्यांच्या नकारार्थी भूमिकांमुळे बैठकीच्या सुरुवातील १० तास वीज हा शेतकऱ्यांचा हक्क असल्याचे राजू शेट्टी यांनी खडसावून सांगितले. तर विद्युत भाराच्या विभागणीत बळी घ्यायला सरकारला शेतकरीच दिसत आहे का? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी केला. तसेच महावितरणला शेतीपंपास दिवसा १० तास कसे वीज देता येईल, याबाबत सविस्तर माहिती सादर केली.

महावितरणच्या कारभारा विरोधात ताशेरे ओढत वीज खरेदी व इतर महावितरणच्या भोंगळ कारभारावर हल्लाबोल केला. तसेच वीज बिलाच्या योजनेची मुदत 31 मार्चला न संपवता ती आणखी 1 वर्ष वाढवून देण्याची मागणी केली. तर मीटर रिडींग घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सी आणि कंपन्यांच्या कामचुकारपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडूनच रिडींग घेण्याची मागणी बैठकीदरम्यान करण्यात आली.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

कृषी व संलग्न कार्ये क्षेत्रात 4.4 % वाढ 

यामुळे होईल आठवड्यात महागाईचा भडका     

शेवग्याची छाटणी करून मिळवा भरपूर शेंगा

ऊर्जामंत्र्यांसोबत झालेली सकारात्मक बैठक शिवाय १५ दिवसात तञ् समितीच्या येणार अहवाल यामुळे ऊर्जामंत्र्यांनी १५ दिवस आंदोलन थांबवण्याची विनंती केली. यानुसार आज कोल्हापूर येथील कार्यालयासमोर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत पुढील चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. यामुळे आता यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 5 Average: 3.2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here