Rice Production Decline : यंदा कमी पावसामुळे शेती पिकाच्या उत्पादनावर (Production) मोठा परिणाम झाला आहे. खरीप हंगामात (Kharif Season) वेळेवर पाऊस न झाल्याने काही पिकांची पेरच झालेली नाही. ज्या पिकांची पेर झाली त्याला पुरेसा पाऊस न मिळाल्याने उत्पादनात घट (Decline) होण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाचा भात (Rice) लावगवडीवर मोठा परिणाम झाला असून, देशाचे प्रमुख पीक असलेल्या तांदळाचे उत्पादन (Rice Production) यंदा 5 टक्क्यांनी घटण्याची (Decline) शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांनो…पाण्याचा ताळेबंद आखून पावले टाका !
सध्या देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. तर काही राज्यांमध्ये अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. कमी पावसाचा परिणाम शेती पिकांवर झालेला आहे. यावर्षी तांदळाच्या उत्पादनात 5 टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त इकोनॉमिक टाइम्सने (Economic Times) दिले आहे.

तांदूळ उत्पादनात आघाडीवर असलेल्या पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे वेळेत भाताची लागण झालेली नाही. परिणामी भात पिकाची वाढ म्हणावी अशी झालेली नाही. त्यामुळे या प्रमुख तांदूळ उत्पादक (Rice Production) राज्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे तांदूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कमी पावसामुळे भात पिकांच्या पेरणी आणि वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनाबाबत चिंता निर्माण झाली आहे. याव्यतिरिक्त, एल निनो (El Nino) आणि प्रतिकूल हवामानामुळे देशाच्या जेडीपी (JDP) वाढीच्या अनुशंगाने FY24 मध्ये जागतिक तांदूळ उत्पादनात अंदाजे 7 दशलक्ष टन तूट झाल्यामुळे जागतिक तांदळाच्या किंमती (Prices Of Rice) वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
ब्रेकिंग : पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार ?
देशात खरीप (उन्हाळी-पेरणी) आणि रब्बी (हिवाळी-पेरणी) या दोन्ही हंगामात भात पीक घेतले जाते. यंदा सरकारने चालू खरीप हंगामात 521.27 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी खरीप हंगामात 496 लाख टन तांदूळ खरेदी (Rice procurement) करण्यात आली होती.

केंद्रीय अन्न मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये 122 लाख टन, छत्तीसगडमध्ये 61 लाख टन, तेलंगणा 50 लाख टन, ओडिशा 44.28 लाख टन, उत्तर प्रदेश 44 लाख टन तांदूळ खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हरियाणामध्ये 40 लाख टन, मध्य प्रदेशमध्ये 34 लाख टन, बिहारमध्ये 30 लाख टन, आंध्र प्रदेश 25 लाख टन, पश्चिम बंगालमध्ये 24 लाख टन आणि तामिळनाडूत 15 लाख टन तांदूळ खरेदीचं उद्दीष्ट आहे.
दरम्यान, 203-24 मध्ये राज्यांकडून 33.09 लाख टन भरड धान्य खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022-23 च्या तुलेनेत यावर्षी खरेदीत मोठी वाढ करण्यात येणार आहे.
मोठी बातमी : कांदा उत्पादक आक्रमक : कांदा लिलाव बंद

https://www.facebook.com/shetimitramagazine03