केंद्र सरकार नागरिकांचे जीवनमान सुधरवण्यासाठी अनेक योजना आखत असते. त्यात काळानुसार बदल देखील केले जातात. मात्र सध्या बऱ्याच योजना या केवळ नावापुरत्याच राहिल्या आहेत. त्या योजनांचा लाभार्त्याना फायदा होत नाही. सोलापूर जिल्ह्यातील देखील अनेक योजना या अपूर्ण आहेत. शिवाय पाण्यावाचून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
हे वाचा : अकोल्यात ‘ट्रॅक्टर आमचे-डिझेल तुमचे’ योजना सुरू
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याचा डाव आखण्यात आला आहे. मात्र उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर पण हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे.
महत्त्वाचा निणर्य : डाळिंब बागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
सोलापूरकरांचा विरोध डावलून उजनी जलाशयातील पाणी बारामती तसेच इंदापूरला देण्यावरून वातावरण आता चांगलेच पेटताना दिसत आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने काल पंढरपुरात या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.
मान्सून अपडेट : मान्सून यंदा मुंबईत 6 जूनला तर मराठवाड्यात 11 जूनला धडकणार !
सोलापूर जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन, सीना-माढा उपसा सिंचन, एकरुख उपसा सिंचन, मंगळवेढा उपसा सिंचन, सांगोला उपसा सिंचन, सीना भीमा उपसा सिंचन, दहिगाव उपसा सिंचन या उजनी धरणावर अवलंबुन असणाऱ्या योजना अद्यापही अपूर्ण आहेत तरीदेखील इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचनासाठी पवार – ठाकरे सरकार कोट्यावधी रुपये देत आहेत, हा खुनशी डाव हाणून पडू असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे.
महत्त्वाचा निणर्य : मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : संपूर्ण गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1