राज्यातील किरणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्येही आता वाइन मिळणार आहे. राज्य सरकारने राज्यातील फलोत्पादक शेतकर्यांसाठी विशेषत: द्राक्ष बागायतदारांच्या हितासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात नाशिक, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक द्राक्ष उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यात घरटी द्राक्षबागा आहेत. त्यामुळेच नाशिक जिल्ह्याला द्राक्ष पंढरी म्हटले जाते. राज्यात सध्या द्राक्षाबरोबरच इतर फळे, फुले, केळी व मधापासूनही वाइन निर्मिती केली जाते. ज्या वाइनरी वाइन विपणन करण्यास असमर्थ आहेत ; अशांना वाईन थेट सुपर मार्केटमध्ये विकण्याची सुविधा या निर्णयामुळे उपलब्ध होणार आहे.

एक हजार चौरस फुटापेक्षा मोठी असलेली किराणा दुकाने आणि सुपर मार्केटला वाइन विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शैक्षणि संस्था आणि धार्मिक स्थळे यापासून 100 मिटर अंतरापर्यंत तंबाखूजन्य पदार्थांना विक्री करता येणार नाही. हीच अट वाइन विक्री करणाऱ्या सुपर मार्केट आणि मोठ्या किरणा दुकानांसाठी लागू करण्यात आली आहे. सध्या सुपर मार्केटशी सलग्न बीअर व वाइन विक्रीचा परवाना देण्यात येतो. आता वाइन विक्रीसाठी पूरक म्हणून सुपर मार्केट किंवा वॉक-इन-स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉपची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी सुपरमार्केट किंवा किराणा दुकानामध्ये सिलबंद बाटलीमध्ये वाइनची विक्री करण्याकरिता परवाना मंजूर करण्यात येणार आहे. त्यासाठी विक्रीचा वेगळा सेल्फ कावा लागणार आहे.
हेही वाचा :
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसाठी काय ?
‘त्या’ निर्णयाविरुद्ध राज्यभर आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील
जमीन भूसंपादन प्रकरणी मोबदला रकमेची परिगणना करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित
खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा : कृषिमंत्री दादाजी भुसे
का होत आहे कांद्याच्या दराची घसरण ?
या निर्णयाचा फायदा नक्कीच फलोत्पादन करणार्या शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष होणार आहे. मात्र या निर्णयाला जसा पाठींबा मिळत आहे तसा विरोधही होत आहे. यासंर्भात विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मद्यराष्ट्र करण्याचा निर्णय खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर आघाडी सरकारमधील मंत्री मात्र या निर्णयाचा बागायतदार शेतकर्यांना कसा फायदा होणार हे सांगता आहे. ज्या जिल्ह्यात दारुबंदी आहे त्या जिल्ह्यात हा निर्णय लागू होणार असल्याचे सांगून हे धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदारांना फायदा व्हावा तसेच वाइन उद्योगाला चालना मिळावी, यासाठी घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा