यंदा मान्सूनच्या पावसाने सर्वाचे अंदाज मोडीत काढत पारंपारिक मुहूर्तालाही हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता गेल्या 24 तासात अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्यावर चक्रीवादळ निर्माण झाल्याने यंदाचा मान्सून लांबवणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोठी बातमी : मान्सूनपूर्व पावसाची 11 जिल्ह्यात दांडी : खरीप हंगाम लांबण्याची शक्यता
पूर्वमध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर संध्याकाळी चक्रीवादळ “बिपोरजॉय” निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा वेग हा 11 किलोमीटर प्रतितास इतका झाला आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि पुढील 24 तासांत पूर्वमध्य अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता, असल्याचे हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, अचानक तयार झालेल्या चक्रीवादळामुळे केरळमध्ये अद्यापही मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालेले नाही. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज हवामान खात्याने आता व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग न्यूज : आज या जिल्ह्यात वादळी पाऊस ?
दरम्यान, वळवाच्या मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात अद्याप हजेरीही लावलेली नाही. मोजके जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पाऊस कमी प्रमाणातच पडला आहे. त्यामुळे राज्यातील खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व कामी खोळंबली आहेत. त्यात आता मान्सून लांबल्यास राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्याही लांबण्याची शक्यता आहे.
साधारणपणे दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होते. मात्र, यंदा मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू आहे. याआधी केरळमध्ये 4 जूनला मान्सून दाखल होईल, त्यानंतर महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
ब्रेकिंग : नक्की मान्सून महाराष्ट्रात कधी ?
मात्र, आता मान्सून केरळमध्ये चार ते पाच दिवस उशीरा दाखल होणार असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात साधारणपणे 13 ते 15 जून दरम्यान पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मान्सून अपडेट्स : जूनमध्ये मान्सून पाठ फिरवणार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1