मान्सूनचे आगमन उशिराने होत असल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर येत आहे. जवळपास एक आठवडा मान्सूनचे आगमन लांबले असताना एल-निनो सक्रिय झाल्याची माहिती अमेरिकेतील नोआ या प्रतिष्ठित संस्थेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
मोठी बातमी : सोयाबीन, कापूस आणि तूरीच्या हमीभावात वाढ
यावर्षीच्या मान्सून आगमनाला उशीर होत आहे. सर्वसाधारणपणे एक जूनला केरळमध्ये येणारा माणूस यंदा आठ दिवस उशिराने अर्थातच आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. राज्यात मान्सून तळ कोकणामध्ये सात जूनला दाखल होतो यंदा मात्र 15 जून पर्यंत तळ कोकणात मान्सून दाखल होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थातच जवळपास एक आठवडा मान्सूनचे आगमन लांबले आहे. अशातच एल-निनो सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे.
खरतर, प्रत्येक तीन ते सहा वर्षांनी भारतीय मान्सूनला एल-निनोचा फटका हा बसत असतो. याआधी 2018 मध्ये देखील एल-निनो या हवामान प्रणालीमुळे मान्सून प्रभावित झाला आहे. याआधीही अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यंदा एल-निनोचे सावट राहील, असा अंदाज बांधला आहे. दरम्यान आता अमेरिकेच्या नोआ म्हणजे National Oceanic and Atmospheric Administration या संस्थेने एलनिनो सक्रिय झाल्याची माहिती दिली आहे.
आनंदाची बातमी : यंदा 25 हजार शेतकऱ्यांना अनुदानातून मिळणार ट्रॅक्टर
याआधी 2018 मध्ये देखील एल-निनो या हवामान प्रणालीमुळे मान्सून प्रभावित झाला होता. त्यावेळी संपूर्ण मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या पिक उत्पादनात घट आली होती आणि शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
आतापर्यंत एल-निनो येईल असे सांगितले जात होते आता मात्र आता एल-निनो सक्रिय झाल्याची माहिती अमेरिकेच्या नोआ या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही एल-निनोचा फटका भारतीय मानसूनला बसणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.
भारतीय मानसून हा जून ते सप्टेंबर या कालावधीत असतो. आता या पावसाळ्याच्या काळात विशेषता 15 जुलै किंवा एक ऑगस्ट नंतर या एल-निनोचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 15 जुलै किंवा एक ऑगस्ट नंतर एल-निनो या हवामान प्रणालीमुळे पावसाचा खंड पडू शकतो, दुष्काळी परिस्थिती तयार होऊ शकते, यामुळे नापीकी आणि आणि टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ब्रेकिंग : यंदा मान्सून केरळकडून येणार नाही : पंजाबराव डख
https://www.facebook.com/shetimitramagazine03