ऐन उन्हाळ्यात राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हवामानात वारंवार बदल होताना दिसत आहेत. अशात पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
खूशखबर : आता मराठवाड्यातून थेट होणार आंबा, मोसंबीची निर्यात
हवामान खात्याने राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 7 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. उद्या 5 एप्रिल रोजी गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथे गुरुवारी 6 एप्रिल रोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मोठा निर्णय : दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक
तसेच गुरुवारी 6 एप्रिल रोजी मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी इथे पाऊस पडण्याची शक्यता असून त्याच दिवशी विदर्भातील अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर शुक्रवार, दि. ७ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी 5 एप्रिल पासून पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील 5 दिवस तीव्र हवामानाचा अंदाज अपेक्षित आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पश्चिम आणि दक्षिण-पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे मिलन झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या कोनीय स्थितीमुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून या भागात दमट वारे निर्माण झाले आहेत.
दरम्यान, तापमानातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळ अनेक ठिकाणी सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. हे वाढलेले तापमानही अवकाळी पावसासाठी मोठे कारण असणार आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1