राज्यात मागचा काही दिवसांपूर्वी मान्सून पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली. दरम्यान कालपासून विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामध्ये पिकांसह साठवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. विदर्भात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आनंदाची बातमी : डाळिंबावरील खोडभुंगेऱ्यावर लवकरच नव्या शिफारशी
विदर्भात अचानक हवामानात बदल झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान मिळत आहे. अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत असून, उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. 26) विदर्भात मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता असून, कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आनंदाची बातमी : पुरंदर येथे मध पोळे चाचणी प्रयोगशाळा सुरु
मागच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 41 अंशाच्या आसपास होता. कोकणात कमाल तापमान 34 ते 36 अंश, मध्य महाराष्ट्रात 27 ते 37 अंश, मराठवाड्यात 36 ते 40 अंश आणि विदर्भात 37 ते 43 अंशांच्या दरम्यान राहिले. दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, बिहारपासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे मान्सून पूर्व पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. 26) विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांना टोमॅटोची लॉटरी : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
बुधवारी (ता. 25) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :पुणे 35.2, धुळे 41, जळगाव 39.5, कोल्हापूर 34.1, महाबळेश्वर 27.1, नाशिक 34.4, सांगली 35.2, सातारा 34, सोलापूर 37 अंश तापमानाची नोंद झाली.
मोठी बातमी : नाफेड हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी अचानकपणे थांबवली
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1