Sugar Export : देशात महागाईचा निर्देशांक (Inflation index) जुलै महिन्यात 7.44 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील दर नियंत्रणासाठी (Rate control) केंद्र सरकार कांदा (Onion), टोमॅटो (Tomato) आणि नॉन बासमती तांदूळानंतर (Non Basmati Rice) आता साखरेच्या निर्यातीवर बंदी (Sugar Export Ban) लागू करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाचे : भाताचे उत्पादन यंदा 5 टक्क्यांनी घटणार ?
रॉयटर या वृत्तसंस्थेने (Reuters News Agency) याबाबत वृत्त दिले आहे. गेल्या काही महिन्यात महागाईच्या निर्देशांक (Inflation index) धोक्याची घंटा वाजवत आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोच्या दराने उच्चांक केला होता. टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली होती. त्यानंतर कांद्याचे दरही वाढले होते. बाजारातील हे दर स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क (Export Duty) लागू केले. आता साखरेच्या दराबाबत (Sugar Rate) सरकार सावध झाले आहे.

दरम्यान, देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) अवघ्या काही महिन्यावर आल्या आहेत. शिवाय वर्षाअखेरीस मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच प्रमुख राज्यांच्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवर नजर ठेवून आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच साखरेच्या निर्यातीवर निर्बंध आणू शकते.
हेही वाचा : शेतकऱ्यांनो…पाण्याचा ताळेबंद आखून पावले टाका !
देशात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात ऊसशेती (Sugarcane Cultivation) केली जाते. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात ही राज्ये आघाडीवर आहेत. यंदा उत्तर प्रदेशात पावसाची परिस्थिती ठीक आहे. मात्र यंदा महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटक या साखर पट्यातच (Sugar Belt) यावेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन (Sugarcane Production) नेहमीपेक्षा किमान 3.5 टक्के घटण्याचे शक्यता आहे. परिणामी साखरेचे उत्पादन (Sugar Production) 10 लाख टनाने कमी होण्याची शक्यता असून, देशांतर्गत बाजारात साखरेचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात साखरेचे दर (Sugar Prices) स्थिर राहावेत या उद्देश्याने केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध आणण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जुलै महिन्यात महागाईचा निर्देशांक 7.44 टक्क्यांवर पोहचला होता. गेल्या 15 महिन्यांत महागाई निर्देशांकाची ही सर्वात मोठी वाढ होती. टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली होती. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 200 रुपयांपर्यंत गेले होते. पाठोपाठ कांद्याच्या दरानेही उचल खाल्ली होती. त्यामुळे सरकारने कांद्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले. आता देशांतर्गत बाजारात साखेरचे भाव याच आठवडयात वाढले आहेत. त्यामुळे साखरेबाबतही निर्यातबंदी (Export Ban) किमान तीन महिने लागू होऊ शकते अशी चर्चा आहे.
ब्रेकिंग : पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार ?
ऊस हे ही कांद्याप्रमाणेच राजकीयदृष्ट्या अती संवेदनशील पीक आहे. महाराष्ट्रात तर अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्यच साखर कारखानदारीवर अवलंबून आहे. सरकारला ग्राहकांसाठी भाव वाढू द्यायचा नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी नीट दर मिळेल याचीही काळजी घ्यायची आहे. त्याच संतलुनात आता कांदा, टोमॅटो पाठोपाठ साखरेचा (Sugar) नंबर आला आहे.

यापूर्वी 2016 मध्ये साखेरच्या निर्यातीवर निर्बंध आले होते. त्यावेळी सरकारने साखरेवर 20 टक्के निर्यातशुल्क लागू केले होते. गेल्या दोन वर्षात भारताने आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) प्रचंड साखर निर्यात (Sugar Export) केली होती. मात्र आता निवडणुकीचे वर्ष आहे, सोबत पावसानेही ओढ दिली आहे. त्यामुळे आता 7 वर्षांनी साखेरच्या निर्यातीला चाप लागू शकतो.
मोठी बातमी : कांदा उत्पादक आक्रमक : कांदा लिलाव बंद

https://www.facebook.com/shetimitramagazine03