महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे हित पाहिले जात नाही; या उलट कर्नाटक, तेलंगणा, गुजरात या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना चांगल्या सोयी दिल्या जात असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी शेजारच्या राज्यात जाण्याची भाषा बोलत आहेत. परंतु शेतकऱ्यांनो राज्य बदलू नका राजकर्ते बदला असा सल्ला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना दिला आहे.
ब्रेकिंग : चक्क डिसेंबर महिन्यात उकाडा : पावसाचेही संकेत
राज्यातील शेतकरी सध्या अनेक संकटांचा सामना करीत आहेत. राज्यातील शेतकरी विविध प्रश्नावरून आक्रमक होत आहेत. सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या हेळसांडीला आपल्या राज्यातील राज्यकर्ते कारणीभूत आहेत. राज्यातील शेतकरी अनेक प्रश्न आणि समस्यांमुळे अक्षरश: कंटाळला असून, तो सोयीसाठी शेजारच्या राज्ता जाण्याची भाषा बोलत. मात्र शेतकऱ्यांनी राज्य बदलू नये राज्यकर्ते बदलावेत असा सल्ला रघुनाथदादांनी दिला आहे.

सध्या सीमावाद पेटला आहे. याबाबत अनेक राजकीय मंडळी हे वगवेगळी वक्तव्य करीत आहेत. जत तालुक्यातील काही गावे पाण्यासाठी कर्नाटक राज्यात जाण्याची भाषा बोलत आहेत. तसेच तेलंगणा आणि गुजरातमध्येही जाण्याची भाषा अनेकजण करीत आहेत. याला आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांचा भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करून रघुनाथदादा पाटील यांनी राज्यकर्ते, कारखानदार, दूधसंघ, व पाळीव संघटनांचे संगनमत वेळीच ओळखावे असाही सल्ला दिला आहे.
मोठी बातमी : महाराष्ट्रात या दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी !
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे हित पाहिले जात नसल्याचे सांगून रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतीमाल विक्रीनंतर 24 तासात पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, तसा कायदा आहे. परंतू दोन-दोन महिने शेतकर्यांना पैसे मिळत नाहीत. धान, ज्वारी, बाजारी, मका यासह अन्नधान्य, कडधान्याच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये मोठी तफावत आहे; याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो, मात्र त्याचा राज्यकर्त्यांकडून विचार केला जात नाही.

उत्तर प्रदेशामधील कारखाने उसाला प्रतीटन 3 हजार 900 रुपये तर गुजरातमधील साखर कारखाने प्रतीटन 4 हजार 700 रुपये भाव देतात. महाराष्ट्रात मात्र परिस्थिती बिकट आहे. हे साखर कारखानदार आणि पाळीव संघटनांचे संगनमत आहे. हे बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी राज्य बदलण्या ऐवजी राज्यकर्ते बदलावेत, असा सल्ला रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.
हे नक्की वाचा : शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1