Fertilizers Prices : शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बातमी आहे. जागतिक खत पुरवठ्यात (Fertilizer supply) अडचणी निर्माण झाल्याने रशियाने (Russia) भारताला (India) डायअमोनियम फॉस्फेटसारखी (डीएपी) खते (Fertiliser) सवलतीच्या दरात देणे बंद केले आहे. यामुळे खते महागणार असून, शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे.
चिंताजनक : पाऊस गायब…पिकांवर रोगराई… शेतकऱ्यांची चिंता वाढली
गेल्या वर्षी रशिया (Russia) हा भारताला सर्वात मोठा खतांचा पुरवठा (Fertilizer supply) करणारा देश बनला होता. हा पुरवठा सवलतीच्या दरात केला जात होता. मात्र, आता बाजारपेठेतील किमतीप्रमाणे खतांचा पुरवठा करण्याची भूमिका रशियाच्या कंपन्यांनी (Russian companies) घेतली आहे. त्यामुळे भारतात खतांच्या किंमती (Fertilizers prices) वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जागतिक स्तरावरील (Global) वाढत्या किमतीमुळे चीननेही खतांची निर्यात (Fertilizers Export) कमी केली आहे. याचाही परिणाम खते महागण्यावर होणार आहे.

रशियन कंपन्यांनी बाजारातील किमतींनुसार खते देण्याच्या निर्णय घेतल्यामुळे भारताचा आयात खर्च (import costs) वाढणार आहे. त्यामुळे जागतिक किमतीत वाढ होत असताना सबसिडीचा भार देखील वाढणार आहे. जागतिक बाजारात खतांची किंमती वाढ असल्याने चीनने देखील परदेशातील खतांची विक्री कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग न्यूज : आता साखरेवर येणार निर्यातबंदी ?
खतनिर्मिती क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे रशियामधील खत कंपन्यांकडून खते सवलतीच्या किंमतीत मिळणार नाहीत. 2022-23 या वित्तीय वर्षात भारताने रशियाकडून 4.35 टन खते आयात केली असून, आयातीचे प्रमाण 246 टक्क्यांनी वाढले आहे.

मागील वर्षी रशियाने भारताला मोठ्या प्रमाणात खतांची विक्री केली होती. त्यामुळे खतांच्या निर्यातीमध्ये चीन, इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती या देशांचा वाटा कमी झाला होता. सवलतीच्या दरात रशियाकडून खतांचा पुरवठा केला जात होता. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात खतांची आयात (Fertilizers import) झाली होती. मात्र, आता सवलतीच्या दरात खतांची आयात होणार नसल्याने भारताचा खर्च वाढू शकतो. परणामी खतांची किंमती (Fertilizers prices) वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाचे : भाताचे उत्पादन यंदा 5 टक्क्यांनी घटणार ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03