Monsoon Active Again : राज्यात ऑगस्ट (August) महिन्यात पावसाने मोठा खंड दिला असून, राज्याच्या विविध भागांतून पाऊस चक्क गायबच (Rains Disappearing) झाला आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Good News) समोर आली आहे. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात (First Week of September) मान्सून पुन्हा राज्यात दमदारपणे सक्रीय (Monsoon active again) होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
चिंताजनक : पाऊस गायब…पिकांवर रोगराई… शेतकऱ्यांची चिंता वाढली
यंदा राज्यात मान्सूनचे (Monsoon) उशिराने आगमन झाले. जुलै (July) महिन्यात चांगला पाऊस झाला. मात्र ऑगस्ट (August) महिन्यात पावसाने मोठा खंड दिला. पाऊस गायब (Rains Disappearing) झाल्याने फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन (soyabin), कापूस (cottan) या महत्त्वाच्या पिकांवर कीड-रोगांचा (Pests Diseases) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. केवळ पावसा आभावी पिके वाया जातील की काय ? अशी शक्यता निर्माण झाल्याने, शेतकऱ्यांची चिंता (Farmers Worry) वाढली आहे.
यंदाच्या एकूण मान्सून पावसाचा (Monsoon Rains) विचार करता राज्यात मान्सूनच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत केवळ 7 टक्के पावसाची कमतरता दिसून येत आहे. आतापर्यंत राज्यात सामान्य 741.10 मिमीच्या तुलनेत 692.70 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मात्र यंदा कुठे अतिवृष्टी (Heavy Rains) तर कुठे पावसाचा पत्ताच नाही असे मान्सूनचे रूप पहावयास मिळाले. मुख्यत: यंदा वेळेत आणि सर्वदूर पावसाचे (Everywhere Rains) प्रमाण कमी राहिले.
ब्रेकिंग न्यूज : आता साखरेवर येणार निर्यातबंदी ?
जुलै (July) महिन्यात चांगला पाऊस झाला. मात्र जुलैनंतर पावसाला ब्रेक लागला. ऑगस्ट (August) महिन्यात पावसाने मोठा खंड दिला. अनेक भागातून पाऊस चक्क गायबच झाला. याचा परिणाम पिकांवर रोगराई पसरली आहे. शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. विहिरी (Wells) व इंधन विहिरींचेही (Fuel Wells) पाणी कमी झाले असून, पाणी साठ्यावर (Water Storage) मोठा परिणाम झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सून टर्फ (आस) सध्या हिमालयाच्या पायथ्याशी केंद्रीत आहे. 2 सप्टेंबरपासून मान्सून टर्फचे पूर्वेकडील टोक दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. त्यामुळे ईशान्य भारतात पुन्हा जोरदार मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुन्हा मान्सून दमदारपणे सक्रीय होण्यासाठी मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आयएमडीने (IMD) वर्तवली आहे.
महत्त्वाचे : भाताचे उत्पादन यंदा 5 टक्क्यांनी घटणार ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03