Rains Disappearing : सध्या राज्यातील सोयाबीन (Soybeans) आणि कापूस (Cotton) ही महत्त्वाची पिके फुलोऱ्यात (Flowering Stage) असताना पावसाने दडी मारली आहे. पाऊस नसल्याने पिकांवर कीड-रोगांचा (Pests and diseases) प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. यंदा सर्व हवामान अंदाज (weather forecast) मोडीत काढत राज्यातून पाऊस गायब (rains disappearing) झाला आहे.
ब्रेकिंग न्यूज : आता साखरेवर येणार निर्यातबंदी ?
सध्या राज्यातील भात, सोयाबीन, कापूस, मका आणि ऊस या पिकांना पावसाची नितांत गरज (Requirement of Rain) आहे. काही भागात वेळेत दिवस पाऊस न पडल्यास पिके जाग्यावर करपून जाण्याची शक्यता आहे. पाऊस गायब (rains disappearing) झाल्याचा मोठा परिणाम भाजीपाला (Vegetables) पिकांवर झाला असून, त्यावर रोग-किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

यंदा राज्यात सोयाबीन (Soybeans) पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोयाबीन हे पीक अवघ्या चार महिन्याचे असल्याने शेतकऱ्यांच्या हातात लागलीच पैसे येतात. यंदा दिवाळीला पैसा यावा या उद्देशाने शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र सध्या सोयाबीन फुलोरा अवस्थेत (Flowering Stage) असताना पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी काळजीत सापडले आहेत.
महत्त्वाचे : भाताचे उत्पादन यंदा 5 टक्क्यांनी घटणार ?
नाशिक (nashik) भागात गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे मका, सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. छ. संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आरापूर गावातील ज्ञानेश्वर थोरात या शेतकऱ्याने पावसा अभावी पीक सुकून जात असल्याने आपल्या शेतात रोटावेटर फिरवला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात जुलै महिन्यात अतीवृष्टी (Heavy Rain) झाली. शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले. आता ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा केवळ 20 टक्केच पाऊस (Rain) झाला आहे. गेल्या 20 दिवसापासून पाऊस गायब (rains disappearing) झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सध्या पाऊस गायब झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही भागातील सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या आहेत. त्याला पाण्याची गरज आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने जमीनीला भेगा पडू लागल्या आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास यंदा उत्पादनात 50 टक्क्यांनी घट येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांनो…पाण्याचा ताळेबंद आखून पावले टाका !
कोरडवाहू (Dryland Agriculture) प्रमाणेच बागायती (Horticultural Agriculture) पिकांवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. यंदा पावसाअभावी ऊसाचे क्षेत्र घटले आहे. हळद पिकावरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील हळद (Turmeric) पिकावर पावसाअभावी किड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. हळद पिकावर पांढरे चट्टे दिसून येत असून, त्यामुळे पानांवर छिद्रे पडली आहेत. त्यामुळे हळदीची वाढ खुंटली आहे. या नव्या रोगामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर कृषी विभागाने (Agriculture Department) मार्गदर्शन करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने विहिरी (Wells) व इंधन विहिरींचेही (Fuel Wells) पाणी कमी झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू प्रमाणेच बागायती क्षेत्रावरही यंदा पावसाचा मोठा परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ब्रेकिंग : पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03