राज्यात थंडी सुरू असताना अचानक उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असतानाच हवामान विभागाने दक्षिणेकडील राज्यात येत्या तीन-चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनीही 12 ते 14 डिसेंबर दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज सार्वजनिक केला आहे.
मोठी बातमी : महाराष्ट्रात या दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी !
थंडीचा महिना सुरू असतांना अचानक झालेला हा बदल शेतकरी वर्गाची चिंता वाढविणारा आहे. गेल्या काही वर्षांपासून वातावरणात अनपेक्षित बदल होत असल्याचे बघायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी तर कडक्याचा उन्हाळा, लांबलेला पावसाळा, आणि हाड गोठवणारी थंडी देखील अनुभवयाला मिळत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे.

दरम्यान, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्यात आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार, ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचे सांगून, अहमदनगर जिल्ह्यात 12 डिसेंबर पासून ते 14 डिसेंबर पर्यंत म्हणजेच तीन दिवस पावसाची शक्यता सांगितली आहे.
हे नक्की वाचा : शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
सध्या संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये काही ठिकाणी हलका पाऊसही झाला आहे. त्यामुळे कडाक्याची पडलेली थंडी अचानक कमी होऊ पाऊस झाल्याने वातावरणात मोठा बदल झाल्याचे जाणवू लागले आहे. थंडीही कमी झाली आहे. मात्र, अचानक झालेला हा बदल नेमका कशामुळे झाला असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे ढगाळ वातावरण असून दक्षिणेकडील राज्यांत आगामी तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतीकरी वर्ग धास्तावला आहे, विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
थंडीचा महिना सुरू असतांना अचानक झालेला हा बदल शेतकरीवर्गाची चिंता वाढविणारा आहे. त्यातच मुसळधार पाऊस सांगितल्याने पुन्हा संकट ओढवण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा : हवामान बदलांमुळे केवळ 10 टक्के आंब्याला मोहोर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1